डॉक्टर मामा!

सध्याच्या युगात भौतिक सुखामागे धावणाऱ्या ह्या पिढीत लोकांसाठी काम करणारी माणसं विरळच. शिकून बहुतेक तरुण High Package च्या मोहापायी परदेशी जाताय. आपल्या देशात, खेडयांमध्ये डॉक्टरांची नितांत गरज असताना खूप सारे Doctors शहरात राहून जास्तीत जास्त पैसा कसा कमावता येईल हे बघतात. Clinic टाकतानाही सरळ सरळ Creamy Layer मधील Patients कसे मिळतील याचा विचार केला जातो. रुग्णांच्या गरजेपेक्षा स्वतःच्या सोयीला Doctors जास्ती प्राधान्य देतात. अशा वेळी काही लोक मात्र वेगळा मार्ग निवडतात. ज्यांना पैशापेक्षा स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग समाजातील सर्व थरातील लोकांसाठी करायचा असतो. पवार मामा त्यापैकीच एक!
डॉ. शांताराम शामभाऊ पवार! १९८० साली अमरावतीच्या Government  कॉलेज मधून D.H.M.S. झाले . ते college चे Topper असल्यामूळे त्यांना हवा तिथे स्वतःचा व्यवसाय अगर मोठ्या पगाराची नोकरी करता आली असती . त्यावेळी त्यांचे काका दिंडोरी तालुक्यातील उमराळे गावात Headmaster होते. ह्या गावात आणि पंचक्रोशीत डॉक्टर नव्हताकाकांनी पवार मामांना सांगितले कि त्या ठिकाणी डॉक्टरची खूप गरज आहे. आणि हाच त्यांच्या आयुष्याचा Turning Point ठरला. १९८१ साली ते उमराळे गावी आले. तसं सधन गाव. पण जिथे सुबत्ता, तिथे गरिबीही असतेच. गावातील गरीब , मजूर लोकांचे डॉक्टर नसल्याने खूप हाल होत. शहरातील doctor आणि त्यांच्या fees ह्या लोकांना परवडणाऱ्या नव्हत्या. त्यामुळे सारी मदार आरोग्य विभागाच्या अधिकारी वर्गावर असायची. त्याकाळी रस्ते आणि दळण-वळणाची साधने नसल्याने तेही हतबल होऊन जात . अशात पवार मामा इथे आल्याने गावाला एक डॉक्टर मिळाला.
त्यांची सुरुवातीची fee होती रुपये . सुरुवातीला त्यांना बराच त्रास झाला . दवाखान्याची सगळी औषधं, इतर साधनं तालुक्याच्या गावाहून आणावी लागत . गावात डॉक्टर नव्हता त्यामुळे Medical ही नव्हत. मग त्यांनीच पुढाकार घेऊन गावात स्वतःची जागा विकत घेतली. दवाखाना आणि Medical गावात सुरु केलं . सुरुवातीला रस्ते नसतांना त्यांना Emergency पायी जावं लागायचं. त्यांनी हे सर्व थकता केलं . पुढे वर्षात त्यांच लग्न झालं. त्यांनी स्वतःच्या पत्नीला D.Pharm ची पदवी घ्यायला लावली आणि Medicalची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. हे सगळ करत असताना त्यांना बाहेरून नोकरीच्या बऱ्याच offers आल्या. पण डॉक्टर ह्या गावाशी जोडले गेले होते. समाजसेवेचे व्रत घेतलेल्या मामांनी साऱ्या Offers धुडकावून लावल्या आणि गावात कर्यसेवेच आपल व्रत चालू ठेवल.
ते गावात आणि पंचक्रोशीत Medical Camps घेतात. गावातील लोकांना साथीच्या आजारांची, त्यावरील उपायांची माहिती करून देतात. यासाठी ते गावातील बँकेची, आरोग्य अधिकाऱ्यांची मदत घेतात. आरोग्य अधिकाऱ्यांना डॉक्टरांच्या पुढाकारामुळे खूप मदत झाली. गावातील गरजू लोकांपर्यंत पोहोचता आलं, त्यांना शासनाच्या योजना समजावून सांगता आल्या. त्यामुळे गावातील आजारांच प्रमाण बऱ्याच प्रमाणावर कमी झाल. ह्या गावाची आणि इथल्या पंचक्रोशीची बरीच प्रगती झाली.
पवार मामा (डॉक्टर) आजही उमराळे गावात रुग्णसेवा करत आहेत. आजच्या घडीला महागाई इतकी वाढलेली असतानाही डॉक्टरांची fee फक्त २० रुपये आहे. बऱ्याच वेळा कमी पैशात ते गरजू आणि गरीब लोकांना उपचार देतात. आजही डॉक्टर बसने ३० km प्रवास करून सकाळी ते संध्याकाळी क्लिनिकवर असतात.
आजच्या धावपळीतहि इतरांचा विचार करणारी, त्यांच्या साठी झटणारी डॉक्टरांसारखी माणसे आम्हाला प्रेरणा देतात! रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद जपणाऱ्या ह्या डॉक्टरला आमचा सलाम
------------------------------------------------------------------
डॉ. शांताराम शामभाऊ पवार
. मु.- उमराळे बु.||, ता. दिंडोरी, जि. नाशिक



13 comments:

  1. Gokul Chintaman Dhatrak3 April 2023 at 14:59

    Pawar mama mhanje Devmanus

    ReplyDelete
  2. लहान थोरांचे सगळ्यांचे डॉक्टर मामा 🙏

    ReplyDelete
  3. सर्वांचे लाडके असे डॉक्टर पवार मामा यांचे कार्य उमराळे पंचक्रोशीतील असलेले सर्वच व्यक्ती कधी विसरू शकणार नाही

    ReplyDelete
  4. खरोखरच अश्या माणसांचा सहवास लाभला हे आमचे भाग्य समजतो The great Man🙏

    ReplyDelete
  5. Really Great man ...

    ReplyDelete
  6. खरोखर डॉ काकाचे कौतुक करावे तेवढे कमीच

    ReplyDelete
  7. खरोखर काका, तुम्ही आमच्या सर्वांसाठी एक आदर्श आहात...तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो ही प्रार्थना🌼

    ReplyDelete
  8. Happy birthday mama

    ReplyDelete
  9. राजू सुरेश थेटे3 April 2023 at 21:27

    डॉ पवार मामा यांना शतशः प्रणाम .करोना काळात अनेक लोकांना अत्यल्प पैशात उपचार केले आणि आजही कित्येक मोठे आजार बरे होतात आपल्या मामांचे उपचार घेऊन

    ReplyDelete
  10. डॉ.पवार साहेब तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.स्वता साठी
    सायंकाळी सहा वाजेपर्यंत सेवा उपलब्ध करुन तुम्हाला पण विश्रांती ची गरज आहे.
    आप जियो हजारो साल साल के दिन हो पंचास हजार
    माऊली जय हरी

    ReplyDelete
  11. Dear Doctor,

    Thank you for your dedication to serve our ruler population and downtrodden and poor patients. You are a real blessing to us. We appreciate everything you do for us. You are gem of a person.
    We are proud of you 👍

    ReplyDelete
  12. Wishing you MANY MANY HAPPY RETURNS OF THE DAY

    ReplyDelete