Crossing Words!


वाचन, माझा नेहमीचा विरंगुळा. मन अस्वस्थ असलं कि मनाला आधार देणारे हक्काचे मुके सोबती म्हणजे, पुस्तकं! तशी ती म्हणायलाच मुकी पण त्यांच्याशी मैत्री झाली कि ते खुप काही बोलतात. Kothrud च Crossword माझा वाचनाचा नेहमीचा अड्डा, जवळ असल्याने सोयीचा. ह्या पुस्तकांच्या शोधात मला अजून एक मित्र मिळाला - सतीश झांजे. आमच्या ह्या blog ची संकल्पना खऱ्या अर्थानी मला त्याला भेटलो तेव्हाच सुचली.
सतीश Crossword मध्ये Security Guard आहे. माझा कल सहसा English पुस्तकांकडे असतो पण एक दिवस मी मराठी Section मधे घुटमळत होतो. माझी पुस्तक शोधताना होणारी अडचण पाहून सतीश लगेच पुढे आला आणि मला मनासारख पुस्तक शोधायला त्याने मदत केली.
सतीश, वय अंदाजे ३०-३२. पटकन तसा तो नजरेत येत नाही पण ग्राहकाला गरज असली कि तो चटकन पुढे येऊन मदत करतो. Crossword सारख्या पुस्तकांच्या एवढ्या मोठ्या दुकानात काम करताना सतीश फक्त एक security guard नाही, तर तो एक वाचकही आहे. कामाच्या व्यापात थोडा वेळ मिळाला तर तो एखाद पुस्तक जरूर चाळतो. सतीशला ऐतिहासिक पुस्तकांची आवड आहे. त्याने ययाती, मृत्युंजय, राधेय, शिवचरित्र वाचले आहे. व.पू. , पु.ल. च्या हलक्या फुलक्या गोष्टी तो आवडीने वाचतो.. चेतन भगत, आमिश यांच्या blockbuster पुस्तकांची, त्यांच्या current trends ची, त्यांच्या लेखनाची त्याला बरीच माहिती आहे. त्या लोकांची पुस्तकं जास्ती पसंद का केली जातात ह्याचं गणितही तो अचूक मांडतो. गेले ९ महीने तो इकडे काम करतोय. ग्राहकांना त्याच्या परीने मदत करतो.

आजच्या पिढीच्या वाचनाच्या सवयींवर बोलताना सतीश सांगतो कि आजची तरुण पिढी वाचनात बराच रस घेते. Crossword मध्ये येणाऱ्या आणि येथे मन लावून वाचणाऱ्या रसिकांमध्ये तरुणच जास्त असतात. TV, Mobile, Internet अशी Knowledge मिळवण्याची इतर सोपी साधन असून सुद्धा आजचा तरुण Fiction-Nonfiction, Biographies, etc etc सगळ आवडीने वाचतो.
सतीशच्या साध्या भाषेत सांगायचं तर 'पुस्तक का वाचायची?' - 'ज्ञान मिळवण्यासाठी कारण त्या ज्ञानाचा आपल्याला जीवनात पावलापावलावर उपयोग होतो आणि पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला दिशा मिळते.'
परिस्थितीमुळे शिक्षण सोडलेला, जेमतेम पगार असणारी Guard ची नोकरी करतानाही आपला वाचनाचा छंद जोपासणारा, जमेल त्याला आपल्या परीने मदत करणारा, परिस्थितीशी लढणारा आणि तिच्यावर मात करणारा सतीश मला खऱ्याखुऱ्या common man चा प्रतिनिधी वाटतो.
सतीश मधल्या Common Man ला आणि त्याच्यातल्या रसिकाला आमचा सलाम..!
----------------------------------------------------------------------
सतीश झांजे
ह. मु. - Crossword-CityPride,
Kothrud, Pune

Serving The Smiles!



आमच्या blogला सर्वांचाच चांगला प्रतिसाद मिळतोय..असच blog वाचून मित्राचा msg आला- "तुझ्या ब्लॉगसाठी perfect profile आहे माझ्याकडे." मग काय? जाऊन धड़कलोच आम्ही COEPला.
So it was COEP, Boat Club Canteen. मागुन वाहणारी नदी, संगमवाडीचा नव्यानेच झालेला bridge, त्यावरची दिसणारी वर्दळ, वातावरणातली शांतता, पक्ष्यांचाच काय तो तेवढा आवाज. एकदम फ्रेश झाल्यासारख वाटल. बराच उशीर झाला होता त्यामुळे canteenमधे वर्दळ नव्हती. आम्ही तिघे बसलो. ऑर्डर दयायला हाक मारली...,"बाबुभाई”.......!
हसत हसत बाबुभाई टेबलापाशी आले. का्य घेणार ह्याची चौकशी केली. दोघांनी order दिली. मी शांत होते तेव्हा त्यांनी स्वत:हून चौकशी केली, "Madam,काय घेणार?" मी “चहा” म्हटल आणि ते order आणायला निघून गेले. तेव्हा मित्राने सांगितल हेच ते, बाबुभाई! मी वळून पुन्हा एकदा त्यांच्याकडे पाहिलं..
बाबुभाई!
सडपातळ शरीरयष्टी, लालसर छटा असलेले केस, गोरा वर्ण, हसरा चेहरा, आनंदी-चमकदार डोळे आणि अंगात कॅन्टीनचा तपकिरी uniform. आपल्याच नादात, सर्वांचे हसुन स्वागत करत ते order घेत होते, येणारा प्रत्येकजण बाबू, बाबुकाका, बाबुभाई अशी हक्काने हाक मारून order सांगत होता, आणि ते प्रत्येकाला serve करत होते.
ते मुळचे वटझर ता. देगलुर जि. नांदेड येथुन. त्यांच खंर नाव संभाजी श्रीपतराव लवाटे. वय वर्षे ४५ (त्यांना पाहून नक्कीच ह्यावर विश्वास बसणार नाही). १०वी नंतर त्यांनी लघुउद्योग प्रशिक्षण घेतलं. काही कारणास्तव १९८२ साली ते COEP ला आले आणि कायमचेच इकडचे झाले.
गम्मत म्हणजे २८ वर्षापूर्वी माझा जन्म पण झाला नव्हता. माझ्या वयापेक्षा जास्त वर्षे एकाच ठिकाणी नोकरी करूनही ते तितक्याच उत्साहाने, आनंदाने आणि प्रामाणिकपणे हे काम करत आहेत. याच कारण बाबुभाई सांगतात कि त्यांना मुलांसोबत बोलायला, गप्पा मारायला आवडतं. सुखी राहण्याची गुरुकिल्ली इतकी सहज सोपी असेल अस कधी स्वप्नातही वाटल नव्हत.
‘आधीच्या आणि आत्ताच्या विद्यार्थ्यांमधे काय बदल झालाय?’ ह्यावर बाबुभाई म्हणाले, ‘पूर्वी मुलं खूप गप्पा मारायचे इथे बसुन. विचारांची देवाण-घेवाण व्हायची. पण आजकाल मुलं mobile, laptop यातच गुंतलेले असतात. त्यामुळे आजकालच्या मुलांमधे संभाषण कमी झालय. माझ्या अस्वस्थ generationच्या अस्वस्थतेच कारण बाबुभाईनी एका झटक्यात उलगडून टाकल. COEP आणि इथल्या त्यांच्या अनुभवाबद्दल ते भरभरून बोलले. COEPमधून शिकून बाहेर पडलेल्या त्यांच्या चाहत्यांनी बनवलेल्या त्यांच्या fanpage विषयीही ते सांगत होते. आजही जुनी मुलं येतात तेव्हा आवर्जून बाबुभाईंना भेटतात. "नावाने प्रत्येकाला ओळखू शकत नसलो तरी चेहरे लक्षात राहतात."
असे हे बाबुभाई!
गेल्या २८ वर्षात बऱ्याच गोष्टी बदलल्या. पुणं बदललं. COEP चा विस्तार झाला. जुन्या दगडी buildings सोबत नव्या buildings उभ्या राहिल्या. Boat Club Canteen सोबत आणखी एक नवं Canteen आलं. बदलला नाही तो एक माणूस आणि त्याच्या चेहऱ्यावरची ती Evergreen Smile.
"माझं काम हीच माझी Hobby!" असं अभिमानाने सांगणाऱ्या बाबुभाईंना आमच्या team चा सलाम.
------------------------------------------------------------------


संभाजी श्रीपतराव लवाटे
ह. मु.- BoatClub Canteen,
COEP, पुणे








Thank You Dhiraj More :-)

MoM...away from home!



आज 'मातृ दिनी' एका वेगळ्या आईची वेगळी भेट तुमच्यासाठी!

Student Life मधल्या दोन गोष्टी अगदी आपण सर्वच अनुभवतो. एक म्हणजे hostel आणि दुसरी म्हणजे आपली mess (खानावळ)….आमच्याही Life मध्ये आम्हीही हि गम्मत अनुभवली. त्याहून भन्नाट म्हणजे आमच्या Colg जवळची "मेस गल्ली"! नावातच गम्मत! त्याच काय आहे ना,इकडे साऱ्या खानावळीच, म्हणून नाव पण तसंच. गल्लीतल्या दुसऱ्याच घरात आमची मेस.
आमच्या वाहिनीची मेस.
त्यांच नाव शोभा इंद्रजित पाटील पण सारेच त्यांनावहिनी’ अस म्हणतात. वहिनी म्हणजे सदोदित उत्साह! नेहमीच आनंदी! त्यांच्या यजमानांना आम्ही पाटील म्हणतो. ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यावर कुटुंबाच भागत नव्हत म्हणून वहिनीनी २७ वर्षांपूर्वी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ही मेस सुरु केली. (त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त एक वर्षाचा होता आत्ता तो Engineer आहे.) मेससाठी भाजीपाला आणणे, किराणा भरणे, हिशोब ठेवणे वगैरे सर्व सांभाळून वाहिनी त्यांच्या घरच्या kitchen  king आहेत. जेवणाचा मेनू एकंदरीत सर्वांच्या आवडी-निवडीचा अंदाज घेऊन त्या ठरवतात. हिशोबाला एकदम चोख असणाऱ्या वहिनी एखाद्या गरजू मूलाला मात्र नेहमीच सवलत देतात. 'हि पोरं एवढ्या लांबून इकडं शिकायला येतात. त्यांची काळजी आम्ही नाही तर कोण घेणार?' अस त्या आपल्या खास आगरी बोलीभाषेत सांगतात. कुणी आजारी असलं तर वहिनी त्याच्याकडे जातीन लक्ष देतात, कुणी कमी जेवत असल तर त्याला बजावून सांगतात, आग्रहाने जेवू घालतात. खरं तर हे सारं आम्हीही अनुभवलंय. पण आज विशेष जाणवलं कि हि माऊली आपल्या 'ह्या' लेकरांनाही किती जपते.
सहजच लक्ष घरातल्या धान्याच्या गोन्याकडे गेलं.त्याविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या 'ते LBT का काय ते चालूय ना बाबा १०-१० दिवस दुकान बंद राहणार म्हणून आगाऊ किरण करून ठेवलाय. उगा पोरांचे हाल नको.' तिकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रजेची काळजी असो वा नसो पण ह्या Home Minister ना त्यांच्या मुलांची काळजी नक्कीच असते.
निघायची वेळ झाली होती मीही उठलो, वहिनींच्या पाया पडलो. त्यांनी तोंड-भरून आशीर्वाद दिला आणि मी तेथून बाहेर पडलो.. वहिनीच्या मेसमधली खूप मुल आज मोठ-मोठ्या पदावर कामाला आहेत, कित्येकांचे संसार उभे राहिलेत पण अजूनही ती मुलं जेव्हा येतात तेव्हा आवर्जून मेसवर जेवायला येतात. वहिनीच्या हातची चव सहसा कुणी विसरत नाही अन त्यांच्या प्रेमालासुद्धा!
आजच्या मातृ-दिनी ह्या मातेला त्रिवार वंदन!
-------------------------------------------------------



शोभा इंद्रजित पाटील
. मु. - मेस गल्ली,
MIT College,
कोथरूड, पुणे.