MoM...away from home!



आज 'मातृ दिनी' एका वेगळ्या आईची वेगळी भेट तुमच्यासाठी!

Student Life मधल्या दोन गोष्टी अगदी आपण सर्वच अनुभवतो. एक म्हणजे hostel आणि दुसरी म्हणजे आपली mess (खानावळ)….आमच्याही Life मध्ये आम्हीही हि गम्मत अनुभवली. त्याहून भन्नाट म्हणजे आमच्या Colg जवळची "मेस गल्ली"! नावातच गम्मत! त्याच काय आहे ना,इकडे साऱ्या खानावळीच, म्हणून नाव पण तसंच. गल्लीतल्या दुसऱ्याच घरात आमची मेस.
आमच्या वाहिनीची मेस.
त्यांच नाव शोभा इंद्रजित पाटील पण सारेच त्यांनावहिनी’ अस म्हणतात. वहिनी म्हणजे सदोदित उत्साह! नेहमीच आनंदी! त्यांच्या यजमानांना आम्ही पाटील म्हणतो. ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यावर कुटुंबाच भागत नव्हत म्हणून वहिनीनी २७ वर्षांपूर्वी कुटुंबाला हातभार लावण्यासाठी ही मेस सुरु केली. (त्यावेळी त्यांचा मुलगा फक्त एक वर्षाचा होता आत्ता तो Engineer आहे.) मेससाठी भाजीपाला आणणे, किराणा भरणे, हिशोब ठेवणे वगैरे सर्व सांभाळून वाहिनी त्यांच्या घरच्या kitchen  king आहेत. जेवणाचा मेनू एकंदरीत सर्वांच्या आवडी-निवडीचा अंदाज घेऊन त्या ठरवतात. हिशोबाला एकदम चोख असणाऱ्या वहिनी एखाद्या गरजू मूलाला मात्र नेहमीच सवलत देतात. 'हि पोरं एवढ्या लांबून इकडं शिकायला येतात. त्यांची काळजी आम्ही नाही तर कोण घेणार?' अस त्या आपल्या खास आगरी बोलीभाषेत सांगतात. कुणी आजारी असलं तर वहिनी त्याच्याकडे जातीन लक्ष देतात, कुणी कमी जेवत असल तर त्याला बजावून सांगतात, आग्रहाने जेवू घालतात. खरं तर हे सारं आम्हीही अनुभवलंय. पण आज विशेष जाणवलं कि हि माऊली आपल्या 'ह्या' लेकरांनाही किती जपते.
सहजच लक्ष घरातल्या धान्याच्या गोन्याकडे गेलं.त्याविषयी विचारल्यावर त्या म्हणाल्या 'ते LBT का काय ते चालूय ना बाबा १०-१० दिवस दुकान बंद राहणार म्हणून आगाऊ किरण करून ठेवलाय. उगा पोरांचे हाल नको.' तिकडे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या प्रजेची काळजी असो वा नसो पण ह्या Home Minister ना त्यांच्या मुलांची काळजी नक्कीच असते.
निघायची वेळ झाली होती मीही उठलो, वहिनींच्या पाया पडलो. त्यांनी तोंड-भरून आशीर्वाद दिला आणि मी तेथून बाहेर पडलो.. वहिनीच्या मेसमधली खूप मुल आज मोठ-मोठ्या पदावर कामाला आहेत, कित्येकांचे संसार उभे राहिलेत पण अजूनही ती मुलं जेव्हा येतात तेव्हा आवर्जून मेसवर जेवायला येतात. वहिनीच्या हातची चव सहसा कुणी विसरत नाही अन त्यांच्या प्रेमालासुद्धा!
आजच्या मातृ-दिनी ह्या मातेला त्रिवार वंदन!
-------------------------------------------------------



शोभा इंद्रजित पाटील
. मु. - मेस गल्ली,
MIT College,
कोथरूड, पुणे.

2 comments: