माझ्यातला देव!

माणसाचं कुतूहल त्याला शांत बसू देत नाही असं म्हणतात… कदाचित त्याच कुतूहलापोटी आज पावलं पुन्हा देवळाकडे वळलीनेहमीप्रमाणे डोक्यात अगणिक विचारांचं तांडव सुरूच होतंकाहीशा संदिग्ध मनानेच आत शिरलो. बाप्पा गाभाऱ्यात विराजमान होते. बाप्पाची हि बाळसेदार मूर्ती पाहून मन नेहमीच प्रसन्न होऊन जातं. आज गर्दी नसल्याने 'पुढे व्हा'… 'चालत राहा'… 'थांबू नका'… असा मंदिरातला नेहमीचा गलका नव्हता. तुरळक माणसं सोडली तर म्हणायला आज देवळात फक्त देव होता! तसा अजूनही माझा त्याच्यावर विश्वास नाहीचं… म्हणूनच कदाचित ुन्हा एकदा निराश होऊन बाहेर पडलो. दहा पावलं पुढ जात नाही तोच माझ लक्ष देवळाबाजूच्या फुलांच्या दुकानाकडे वळलंतिथे एक पन्नाशीतली वृद्धा शांतपणे फुलांच्या गराड्यात बसून होती. अंगावर नऊ-वार साडी, तिचा डोक्यावरून घेतलेला पदर, हातात काचेच्या डझनभर बांगड्याअशा तीच ते दुकान. त्यात बसायला गोणपाट, त्याच्याच खाली पैशांचा गल्लासमोर रांगेनं वेग-वेगळ्या पाटीत भरून ठेवलेली फुलंटांगलेल्या फुलांच्या माळामी सरळ तिच्याकडे गेलो आणि बोलायला सुरुवात केली.
नाव सिंधूबाई अवसरे! मुळच्या ती बार्शी जि. उस्मानाबाद येथुन. वयाच्या १३व्या वर्षापासून ती हा फूलांचा व्यवसाय करत आहे. लग्नानंतर पुण्यात सासरी आली. इकडे त्यांच मिठाईच दुकान होत. पण पुढे वाढत्या महागाईत तिथून मिळणार उत्पन्न अपूर पडू लागल. तेव्हा घराला हाथभार लावण्यासाठी तिनं हा व्यवसाय सुरु केलाहाच व्यवसाय का अस मी विचारल तर तिनं सांगितलं, 'आम्ही जातीनं माळी.. आणि मला फुलांत रमायला आवडत. मग मी फुलांचाच व्यवसाय करायचं ठरवलं..' बोलण्याच्या ओघाने जातीचा उल्लेख आलाच होता म्हणून मी विचारलं 'तुमचा जाती-धर्मावर विश्वास आहे?' त्यावर ती म्हणाली, ' माझा जाती-धर्मावर विश्वास नाही. माझा देवावर विश्वास आहे. गणपतीच्या देवळाबाहेर फुलं विकत असून पण मी कधी मंदिरात जात नाही. मी इथूनच त्याची पूजा करते. माझा माझ्या कामावर अन स्वतःवर विश्वास आहे. माझ काम हाच माझा देव.' आणि बोलताना पुढं ती म्हणाली, 'गणपती हा आनंद देणारा देव आहे. त्याच्याकडे येत जा आणि तुझ काम अगर अभ्यास मन लावून कर मग तू नक्की यशस्वी होशिल.' मनातली खळ-बळ मला शांत बसूच देत नव्हती म्हणून कि काय मी तिला पुन्हा विचारलं , 'जर देव कामात असतो तर लोक एवढे पैसे खर्च करून त्याला बाहेर का शोधत असतात? यात्रा,कीर्तन,प्रवचन सगळं करूनहि त्यांना त्यांना देव का सापडत नाही?' त्यावर ती म्हणाली, 'लोकांची हाव खूप मोठी आहेरं बाबा. त्यांना सगळच लवकरी हवय. अगदी देव पण सुपर फास्ट गावाया पहिजे. ह्याचाच फायदा हे बाबा लोक घेतात आणि देवाचा business करत्यात. देवच शोधायचा तर तो आधी स्वतःत शोधा. आणि खर सांगायचं तर तो तिथंच सापडल….!'
तिचा निरोप घेऊन मी निघालो. तूर्तास तरी मनातलं विचारांचं वादळ शांत झाल होतं. पाहूयात माझ्यातला देव मला आत्तातरी सापडतो का?

---------------------------------
सिंधुबाई अवसरे
. मु. - दशभुजा गणपती मंदिर,
कोथरूड, पुणे.

1 comment: