'माणसं' छोटी डोंगराएवढी!

 .......सुरुवात!
 "India Shining" चा नारा सगळीकडेच दिला जातोय. जो तो विकासाचे पोवाडे गातोय. अशावेळी मन अस्वस्थ होत ह्या विचाराने - 'Is  India really shining ?'
आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा  असणाऱ्या शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. ज्या देशाची ७०% लोकसंख्या खेड्यात राहते तिथल्या लोकांना त्यांच्या मुलभूत गरजाही पूर्ण करता येत नाहीत. Mobileनि सगळ्या जगाशी connect तर झालो पण एका गावाहून दुसऱ्या गावात जायला धड रस्ते नाहित. महिला सबलीकरणासाठी रोज नवीन योजना येतेय पण महिला आजही सुरक्षित नाहीत. शिक्षणसंस्था शेकडोंनी वाढल्या पण तरीही देशातला तरुण हातात degree च भेंडोळ घेऊन दारो-दार नोकरीसाठी वण-वण फिरतोय.
मग प्रगती कुणाची?
विकास कुणासाठी?
मुठभर अब्जोधीशांसाठी कि तुमच्या-आमच्या सारख्या करोडो जनतेसाठी?
अशावेळी अस्वस्थ मनाला नव्यानं उभारी देतात 'माणसं' छोटी डोंगराएवढी!
आपल्या प्रत्येकामध्ये क्षमता असते काही असामान्य करून दाखवण्याची. काहीजण ती वेळीच ओळखतात आणि मग जगण आनंदी होऊन जातं... त्यांच्या स्वतःसाठी अन त्यांच्या सहवासातील इतरांसाठीहि!
हा blog अशाच Real Life Heroes बद्दल!
त्यांनी खूप काही वेगळ नाही केल...  फक्त आपल्या आयुष्य आनंदाने जगण पसंत केलं.
आलेल्या संकटाना कारण नाही दिली, पळवाटा नाही शोधल्या तर आपल्या कुवतीप्रमाणे त्यावर मार्ग काढला.
आम्हाला अन कदाचित तुम्हालाही जगण्याची कला शिकवणाऱ्या ह्या 'माणसां'ना सलाम!

No comments:

Post a Comment